पनवेल मध्ये स्कूलबसला आग

August 20, 2009 7:30 AM0 commentsViews: 2

20 ऑगस्ट पनवेलच्या सीकेटी शाळेच्या स्कूल बसला आग लागून 15 मुलं भाजली आहेत. त्यातील 2 मुलं 60 टक्के भाजली असून ती गंभीर आहेत. त्यांना भायखळ्यातील मसीना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय. तर इतरांना पनवेलच्या लाईफलाईन, सहस्त्रबुद्धे हॉस्पिटल, गुणे हॉस्पिटल आणि एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी बसचालक विश्वनाथ फडतरे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

close