राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसमध्ये विलीन व्हावं- दिग्विजय सिंग

August 20, 2009 9:46 AM0 commentsViews: 10

20 ऑगस्ट राष्ट्रावादी काँग्रेसने काँग्रेसमध्ये विलीन व्हावं,असं पुन्हा एकदा दिग्विजय सिंग यांनी म्हंटलं आहे. ते मुंबईत बोलत होते. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी असंच वक्तव्य केलं होतं. तेव्हा त्यांच्या या वक्तव्याबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिग्विजय सिंग यांना फटकारलंही होतं. आणि आमच्यात उगाच लुडबूड करू नये, प्रत्येक पक्षाची धोरणं ठरलेली असतात, असं पवार यांनी म्हटलं होतं. पण त्यानंतरही गुरूवारी पुन्हा दिग्विजय सिंग यांनी पुन्हा विलीनीकरणरणाचा मुद्दा उपस्थित केला आहे.

close