‘विकासात विज्ञानाचं महत्त्व’

January 3, 2015 6:53 PM0 commentsViews:

03 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई विद्यापीठात इंडियन सायन्स कॉंग्रेसचं उद्घाटन पार पडलं. या कार्यक्रमात जगभरातील शास्त्रज्ञ आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यक्रमात त्यांनी नोबेल पारितोषिक विजेत्या वैज्ञानिकांचा सत्कार केला. तसंच भारतीय वैज्ञानिकांचाही यावेळी गौरव करण्यात आला. इंडियन सायन्स काँग्रेसच्या निमित्तानं विज्ञान, शिक्षण,आरोग्य, उद्योग, पायाभूत सुविधा या क्षेत्रातले 12 हजारांहून अधिक तज्ज्ञ मुंबईत दाखल झालेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वसंत गोवारीकरांना श्रद्धांजली वाहून आपल्या भाषणाची सुरवात केली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close