आघाडीबाबत दोन दिवसात निर्णय घेऊ – मुख्यमंत्री

August 20, 2009 9:50 AM0 commentsViews: 3

20 ऑगस्ट विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करायची की नाही याबाबत येत्या दोन-तीन दिवसात निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे. मुंबईत गुरुवारी राजीव गांधी जयंती निमित्त कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. दोनच दिवसांपूर्वी काँग्रेसच्या उच्चस्तरीय समितीची दिल्लीत बैठक झाली होती. त्यात राज्यातील अनेक बडे नेते सहभागी झाले होते. मात्र त्या बैठकीत कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. राज्यातील काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी स्वबळावर लढण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली आहे.

close