दिवा तोडफोड प्रकरणी 25 अटकेत, 16 हजार जणांवर गुन्हे दाखल

January 3, 2015 9:31 PM0 commentsViews:

diva_local3403 जानेवारी : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यानंतर दिव्याजवळ प्रवाशांना तोडफोड केली होती. या प्रकरणी आता 25 जणांना अटक केलीये तर मुंब्रा पोलिसांनी अज्ञात 16 हजार लोकांविरूद्ध गुन्हे दाखल केलाय तर रेल्वे पोलिसांनीही 12 हजार लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.

डोंबिवलीजवळ पेंटाग्राफ तुटल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक तब्बल सात तास विस्कळीत झाली होती. त्यामुळे संतप्त झालेले प्रवाशी ट्रॅकवर उतरले होते. संतप्त झालेल्या जमावावे जोरदार तोडफोड केली होती आणि पोलिसांनी व्हॅन पेटवून दिली होती. आता या प्रकरणी दिवा पोलिसांनी 25 आरोपींना अटक केलीये तर रेल्वे पोलीसांनी 12 हजार अज्ञात लोकांविरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या सगळ्यांवर सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान, नागरिकांना कामावर जाण्यास रोखणे, मनाई आदेश तोडणे, दंगल माजवणे तसंच पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण करणे असे गुन्हे दाखल केले आहेत. पण रेल्वे पोलिसांनी अजून कोणालाही अटक केलेली नाही.जमावाने सीसीटीव्ही फोडल्यानं जीआरपी पोलीसांच्या तपासात अडथळे येत आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close