सलमान खानच्या घराबाहेर तमिळी संघटनांची निदर्शनं

January 4, 2015 12:03 PM0 commentsViews:

Salman khan

04 जानेवारी :  बॉलिवूड स्टार सलमान खान याच्या वांद्रेतील घराबाहेर आज (रविवार) तमिळ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. श्रीलंकेचे अध्यक्ष महेंद्रा राजपक्षे यांचा प्रचार केल्याने तमिळ संघटना आक्रमक झाल्या आहेत.

पोलिसांनी निदर्शनं करणार्‍या 10 ते 15 तमिळ आंदोलकांना ताब्यात घेतलं असून सलमानच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ केली आहे.

श्रीलंकेत येत्या काही दिवसांतच अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. त्यामुळे महेंद्रा राजपक्षे यांच्या प्रचारासाठी सलमान खान श्रीलंकेत गेला होता. सलमान नुकताच अभिनेत्री आणि श्रीलंकेची असलेली जॅकलीन फर्नांडिससोबत श्रीलंकेला गेला होता. त्यावेळी त्याने आपण प्रचारासाठी श्रीलंकेत जाण्याचा निर्णय घेतला होता. 

सलमानच्या या निर्णयाचा तमिळनाडूतील सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांकडून निषेध करण्यात आला होता.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close