रत्नागिरीत सुरेश प्रभूंविरोधात निदर्शन, निलेश राणेंना अटक

January 4, 2015 2:40 PM0 commentsViews:

Nilesh rane news

04 जानेवारी :  कोकण रेल्वेच्या समस्यांचा विसर पडल्याचा आरोप करीत माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यर्त्यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या विरोधात आज रत्नागिरीत जोरदार निदर्शने केली.

रेल्वेमंत्री प्रभू आज रत्नागिरीच्या दौर्‍यावर आहेत. ते रत्नागिरीचा दौरा करत असताना माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी रोखण्याचा प्रयत्न केला. या वेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, रेल्वेमंत्र्यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न करणार्‍या निलेश राणे यांच्यासह 30- 35 कार्यकर्त्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close