पक्षनेत्यांनी पुस्तक लिहिण्यावर आक्षेप नाही- जेटली

August 20, 2009 11:09 AM0 commentsViews: 1

20 ऑगस्ट पक्षाच्या नेत्यांनी पुस्तक लिहीण्यावर भाजपला आक्षेप नाही. मात्र पक्षाच्या विचारसरणीच्या विपरीत लिखाण करायचं असेल तर अशा लोकांनी पक्षाबाहेर जाणं योग्य, असा इशारा भाजपचे अरुण जेटली यांनी दिला आहे. जसवंत सिंग यांना पक्षातून काढून टाकल्यानंतर पक्षाचे नेते अरुण जेटली यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेतली. त्यात ते बोलत होते. गुजरात सरकारने जसवंत सिंग यांच्या पुस्तकावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. हा त्या त्या राज्याचा प्रश्न असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. सध्या भाजपाची चिंतन बैठक सिमला येथे सुरू आहे. 'जिना: इंडियाज पार्टीशन इंडिपेडेन्स' या जसवंतसिंग यांनी लिहिलेल्या पुस्तकात त्यांनी जिना यांचं कौतुक केलं होतं. त्यावरून वाद सुरू झाला आहे.

close