पुण्यात पालिकेसाठी राष्ट्रवादीकडून काँग्रेसला आघाडीचा प्रस्ताव

August 20, 2009 11:26 AM0 commentsViews: 1

20 ऑगस्टपुणे महानगरपालिकेत आघाडी करण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादीने काँग्रेससमोर ठेवला आहे. त्यानुसार राष्ट्रवादीचा महापौर तर काँग्रेसचा उपमहापौर असेल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील यांनी दिली आहे. त्यांच्या आव्हानाला सुरेश कलमाडी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला बाहेरुन पाठींबा देण्याची तयारी दर्शवली आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेना-भाजपने बहुचर्चित पुणे पॅर्टन मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या दबावाला राष्ट्रवादी बळी पडणार नाही. काँग्रेसनं लोकसभा यशाच्या भ्रमात राहून नये. विधानसभा निवडणुकीत आम्हीच बाजी मारणार, असा विश्‍वासही आर. आर. पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

close