राज्यातलं लोडशेडिंग एक तासाने वाढणार

August 20, 2009 1:04 PM0 commentsViews: 1

20 ऑगस्ट विजेची मागणी दुपटीने वाढल्यामुळे राज्यात लोडशेडिंगमध्ये एका तासाने वाढ कऱण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ऊर्जामंत्री सुनील तटकरे यासंदर्भात अधिकार्‍यांशी शुक्रवारी चर्चा करून, त्याचं वेळापत्रक ठरवतील. राज्यात सरासरी 70 टक्केच पाऊस झाला आहे, त्यामुळे पाण्याची उपलब्धतेत घट होणार आहे. त्याचा परिणाम वीज निर्मितीवर होणार आहे, अशी माहिती ऊर्जामंत्र्यांनी दिली. निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यातच लोडशेडिंगमध्ये वाढ झाल्यास, त्याचा फटका सरकारला बसू शकतो, त्यामुळे बाहेरच्या राज्यातून वीज विकत घ्यावी, असा पर्याय काँग्रेसच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला. त्यावर अजूनही निर्णय घेण्यात आलेला नाही. राज्यात सध्या विजेच्या उपलब्धतेत 4 ते साडेचार हजार मेगावॅटची तफावत आहे.

close