राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा पराक्रम, महापौरांना दिला बिअरचा बॉक्स भेट

January 5, 2015 8:21 PM0 commentsViews:

thane_mahapor05 जानेवारी : बिअरबार मालकांच्या फायद्यासाठी काम करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चक्क ठाणे महापालिकेच्या  महापौरांनी बिअरचे बॉक्सचं भेट दिले. कार्यकर्ते एवढ्यावरच थांबले नाही त्यांनी महापौरांच्या दालनात बिअरच ओतलीय. या प्रकारामुळे पालिकेत एकच गोंधळ उडाला.

नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर संजय भाऊराव मोरे यांनी शहरातील बारला अभय दिल्याच्या आरोप करत या प्रकाराच्या निषेधार्थ आज ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चक्क महापौरांच्या दालनासमोर बिअर चे टीन फोडून आंदोलन केलंय. त्यामुळे पालिकेत गोंधळ उडाला. अखेर राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी महापौरांची भेट न झाल्यावर कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करून निषेध नोंदविला.महापौरांच्या भूमिकेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी निषेध केल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं .हा प्रकार निंदनीय असल्याचं सांगून पोलीस तक्रार करणार असल्याचे महापौरांनी सांगितलं.आवश्यकता वाटल्यास या प्रकाराला चोख उत्तर देणार असंही सांगितलं. या प्रकारची नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close