धक्कादायक, अल्पवयीन मुलाला जिवंत पेटवलं

January 5, 2015 8:38 PM0 commentsViews:

pune_chakan05 जानेवारी :पुण्याजवळ चाकणमध्ये एका 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलाला जिवंत पेटवून दिल्याची खळबळजनक घटना उजेडात आलीये. आकाश महाळुंगकर असं या मुलाचं नाव असून त्याला उपचारासाठी ससून हॉस्पिटलमध्ये दाखल केलं मात्र दोन उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

घडलेली हकीकत अशी की, पुण्याजवळील चाकणजवळच्या कोरेगाव खुर्दमध्ये राहणारा आकाश महाळुंगकर रविवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमाराला प्रातर्विधीसाठी टेकडीवर गेला होता, त्यावेळेस अंधारात पाठीमागून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्याला पकडून ठेवलं आणि त्याच्या अंगावर रॉकेल टाकून त्याला पेटवून दिलं. पेटल्यामुळे आकाशनं जोरजोरात ओरडायला सुरूवात केल्यानंतर घरातले लोक जागे झाले आणि त्यांनी आकाशला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत आकाश जवळपास 80 टक्के भाजला होता. चाकण पोलिसांनी आकाशचा मृत्यूपूर्वी जबाब नोंदवून घेतला होता. कोरेगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत आकाश शिकत होता. त्याचे वडील शेतकरी आहेत. या घटनेला 24 तास उलटून गेले, पण अजूनही आकाशला जाळण्यामागचं गूढ कायम आहे. या प्रकरणाचं कारण न कळल्यामुळे गावात भीतीचं वातावरण आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close