अशीही सावित्रीची लेक…

January 5, 2015 9:46 PM0 commentsViews:

05 जानेवारी : मुंबईतल्या सायन्स काँग्रेसमध्ये देशभरातल्या विद्यार्थ्यांचे प्रकल्प मांडण्यात आले होते. यामध्ये सगळ्यात जास्त चर्चा झाली ती यवतमाळच्या अंजली गोडे या मुलीच्या प्रोजेक्टची. या प्रोजेक्टची माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांनीही प्रशंसा केलीय. यवतमाळच्या एस.पी.एम.गर्ल्स हायस्कूलमध्ये दहावीत शिकणार्‍या अंजलीने सायकलवर चालणार स्वयंचलित फवारणी यंत्र तयार केलाय. वेळेची आणि श्रमाचीही बचत करणारं असं हे यंत्र आहे. सोयाबीन, चणा , गहू , ज्‌ावरी , उस , केळी अशा सगळ्या पिकांसाठी या यंत्राचा वापर होतो. मजुरांची टंचाई हा अनेक शेतकर्‍यांचा डोकेदुखीचा प्रश्न बनलेल्या सध्याच्या काळात हे यंत्र शेतकर्‍यांसाठी फायदेशीर ठरू शकतं.आणि सायन्स कॉंग्रेसमध्ये मांडण्यात आलेल्या या एकाच प्रकल्पाची ए पी जे अब्दुल कलाम यांनी पाहणी केली आणि अंजलीची पाठ थोपटली.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close