बच्चेकंपनीसाठी ‘धूम’ कार…

January 6, 2015 12:06 AM0 commentsViews:

एका साऊथ कोरीयन कंपनीने लहान मुलांसाठी 9 फुटांची धडाकेबाज इलेक्ट्रॉनिक कार तयार केली आहे. ‘ब्रुन एफ 8′ असं नाव असलेल्या या कारची किंमत एक हजार डॉलर आहे. या कारमध्ये एक टॅब्लेटही बसवण्यात आला आहे. 5 वर्षाखालील मुलांसाठी ही कार म्हणजे एक हटके खेळणं ठरणार आहे हे नक्की. तासाला 14 किलोमीटर असा वेग धरणार्‍या या कारमध्ये एक सेंसर लावण्यात आले आहे जे वोल्टेज, दिशादर्शक आणि आतील तापमानाची नोंद ठेऊन सांगणार आहे. एक लग्झरियस स्पोर्टस् कारचे हे छोटे मॉडेल, असेही आपल्याला म्हणता येईल. यांत बसवलेला 7 इंचचा टॅबही रिचार्ज होत राहणार आहे. शिवाय ही कार ब्लु-टूथ रिमोट कंट्रोलद्वारेही नियंत्रित करता येऊ शकते.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close