मार्डच्या डॉक्टरांचं साखळी उपोषण सुरु

August 21, 2009 8:03 AM0 commentsViews: 1

21 ऑगस्ट राज्यभरातले निवासी डॉक्टरांनी म्हणजेच मार्डच्या सदस्यांनी शुक्रवारपासून साखळी उपोषण सुरु केलं आहे. मार्डच्या डॉक्टरांनी स्टायपेंडवाढीसाठी जुलै महिन्यात बेमुदत संप पुकारला होता. या संपानंतर झालेल्या वाटाघाटींमध्ये निवासी डॉक्टरांना सरकारने स्टायपेंड वाढ दिली. परंतु ही वाढ 2007-08 या सालासाठी लागू केलेली नाही. त्यामुळे या वर्षाचे ऍरियर्स मार्डला मिळणार नाहीत. गुरुवारी काढण्यात आलेल्या जीआरमध्ये सरकारने ही फसवणूक केली असल्याचं उघड झाल्याने त्याविरोधात साखळी उपोषणाचा निर्णय घेतल्याचं मार्डचे सचिव डॉ. अनिल दुधभाते यांनी सांगितलं. परंतु H1N1 च्या प्रभावामुळे मार्डचे डॉक्टर सर्व काम करुन हे आंदोलनात सहभागी झाल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

close