चायना मास्टर्स सुपर सिरीजमध्ये सायनाला नोएन्ट्री

August 21, 2009 8:07 AM0 commentsViews:

21 ऑगस्टयावर्षी होणार्‍या चायना मास्टर्स सुपर सिरीजमध्ये सायना नेहवालला सहभागी होता येणार नाही. कारण इंडियन बॅडमिंटन फेडरेशनच्या पदाधिकार्‍यांचा हलगर्जीपणा मुळे सायनाच्या स्पर्धेतल्या सहभागाविषयीचा ई-मेल करण्यास ते विसरले आहेत. त्यासाठी 11 ऑगस्ट ही शेवटची तारीख होती, पण या पदाधिकार्‍यांना मात्र उशिराच जाग आली. त्यामुळे सायना नेहवालला चायना मास्टर्स सुपर सिरीजमध्ये सहभागी होता येणार नाही. तिच्याबरोबरच भारताच्या इतर टॉप बॅडमिंटन खेळाडुंनाही याच चुकीमुळे स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाहीत. यामध्ये चेतन आनंद तसंच मिक्सड डबल जोडी ज्वाला गुट्टा आणि व्ही. दिजु यांचा समावेश आहे.

close