‘पीके’ची 300 कोटींवर भरारी, बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास

January 6, 2015 8:46 AM0 commentsViews:

poster_2

06 जानेवारी : आधी पोस्टर आणि मग धार्मिक भावना दुखावल्याच्या कारणावरून वादात भोवर्‍यात अडकलेल्या आमिर खानच्या ‘पीके’ने तब्बल 300 कोटींची कमाई करून हिंदी सिनेसृष्टीत नवा इतिहास रचला आहे. आमिरने स्वत:च्याच ‘धूम 3’चा विक्रम मोडित काढत हा रेकॉर्ड रचला आहे.

या सिनेमाची रिलीजपूर्वीच त्याच्या पोस्टरवरूनही चर्चा होती. सिनेमा 19 डिसेंबर रोजी रिलीज झाला. ‘पीके’वर धार्मिक भावना दुखावल्या अशी प्रखर टिकादेखील होत आहे. देशभरात पीकेच्या विरोधात निदर्शनेदेखील करण्यात आली. पण रिलीज झाल्यापासून पीकेच्या तिकीटबारीवर सिनेमाच्या कमाईचा आकडा दिवसेंदिवस वाढत जात आहे.

सिनेमात आमिर खानशिवाय, अनुष्का शर्मा, सुशांतसिंह राजपूत, बोमन इराणी यांच्या मुख्य भूमिका आहेत. 2008मध्ये आलेला आमिरचा ‘गजनी’ 100 कोटी कमाई करणारा पहिला सिनेमा ठरला होता. त्यानंतर 2009मध्ये रिलीज झालेला ‘थ्री इडियट्स’ 200 कोटींचा गल्ला जमवणारा पहिलाच सिनेमा होता. अशातच आमीरच्याच ‘धूम-३’लाही मागे टाकत  आता ‘पीके’ने 300 कोटींचा क्लब तयार केला आहे. हा एक नवा इतिहास पीकेने रचला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close