जसवंतसिंग यांच्यावरील कारवाई दु:खदायक – सुषमा स्वराज

August 21, 2009 9:35 AM0 commentsViews: 11

21 ऑगस्टजसवंतसिंगांचं प्रकरण दु:खदायक होतं अशी कबुली देत त्यांचं वर्तन पक्षविरोधी होतं असं भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज यांनी सांगितलं. सिमल्यात झालेल्या चिंतन शिबारानंतरच्या भाजपच्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. लालकृष्ण अडवाणी आणि जसवंतसिंगांच्या वक्तव्यांची तुलना करण्याची गरज नाही असंही त्या म्हणाल्यात. काँग्रेसची मक्तेदारी संपवण्यासाठी आघाडीचं राजकारण गरजेचं आणि यापुढे देशात आघाडीचं राजकारण असेल असंही त्यांनी सांगितलं. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांनी जोश भरण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांमध्ये 1984मधला आत्मविश्वास पुन्हा जागवणार असल्याचंही त्या म्हणाल्या.

close