नवी मुंबईतल्या सर्व स्कूल बसेसची होणार तपासणी

August 21, 2009 9:39 AM0 commentsViews: 4

21 ऑगस्टनवी मुंबईतल्या सर्व स्कूल बसेसची तपासणी करण्याचा निर्णय आरटीओनं घेतला आहे. या तपासणीसाठी नवी मुंबईत 5 तपासणी केंद्र उघडण्यात येणार आहेत. तसंच विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक करणार्‍या स्कूल बसेसवर कारवाई होणार आहे. गुरुवारी पनवेलच्या सीकेटी शाळेच्या स्कूल बसला आग लागून 22 मुलं भाजली होती. त्यातली 2 मुलांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. या पार्श्वभूमी आरटीओनं हा निर्णय घेतला आहे. तसंच या घटनेची चौकशी करण्याचे आदेश उपजिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत. शाळा प्रशासनाने याप्रकरणी हात झटकलेत.

close