मराठा आरक्षणाचा निर्णय 4 दिवसात घेण्याचा मेटेंचा इशारा

August 21, 2009 11:30 AM0 commentsViews: 1

20 ऑगस्टनिवडणुकीच्या तोंडावर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. आरक्षणाबाबत चार दिवसांमध्ये निर्णय न झाल्यास आम्ही इतर पर्यायांचा विचार करू, असा इशारा विनायक मेटेंनी दिला आहे. यासोबतच मराठा नेत्यांनीच मराठा समाजाला फसवल्याचा आरोपही मेटेंनी केला. मराठा समाजाचा नेहमीच राजकीय हेतूसाठी उपयोग करण्यात आला आहे, असंही ते म्हणाले. त्यांचा हा आग्रह गरीब मराठा मुलांसाठी असल्याचा त्यांनी सांगितलं. आरक्षणाची मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही आमचा वेगळा निर्णय घेऊ असं मेटे यांनी सांगितलंय.

close