वर्ल्डकपसाठी अशी आहे टीम इंडिया

January 6, 2015 5:17 PM0 commentsViews:

team_india_for_world_cup06 जानेवारी : ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंडमध्ये होणार्‍या 2015 वर्ल्डकपच्या महासंग्रामासाठी भारतीय टीमच्या ‘योद्धां’ची निवड करण्यात करण्यात आलीये. एकूण 15 जणांची यासाठी निवड करण्यात आली आहे. 2011 नंतर पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोणीच्या नेतृत्वाखालीच टीम इंडिया इतर संघांना टक्कर देणार आहे. वर्ल्ड कपसाठी टीम इंडियामध्ये मात्र युवराज सिंगला अखेरपर्यंत स्थान मिळू शकलं नाही. पण नव्या दमाच्या खेळाडूंना संधी मिळालीये. रवींद्र जडेजा,अक्सर पटेल, स्ट्युअर्ट बिन्नी आणि उमेश यादव यांना संधी देण्यात आली आहे.

अशी आहे वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया

महेंद्रसिंग धोणी (कॅप्टन), शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, सुरेश रैना, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, आर. अश्विन
अक्सर पटेल, भुवनेश्वर कुमार, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, स्ट्युअर्ट बिन्नी आणि उमेश यादव
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close