अखेर भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रावसाहेब दानवे

January 6, 2015 6:45 PM0 commentsViews:

ravosaheb_danve306 जानेवारी : अखेर भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी जालन्याचे खासदार आणि राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी नवी दिल्लीत दानवे यांच्या नावाची घोषणा केली आहे.

अखेर रावसाहेब दानवे यांच्या गळ्यात भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडलीये. दोन दिवसांपुर्वी मुंबईत झालेल्या बैठकीत दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं होतं. आज त्यांच्या निवडीची ठरल्या प्रमाणे औपचारीक घोषणा झाली. रावसाहेब दानवे यांच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याने जालन्यात जल्लोष करण्यात आला. औरंगाबाद येथील भाजप कार्यालयासमोर फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला. ढोल ताश्याच्या तालावर कार्यकर्त्यांनी पेढे वाटप केलंय. भाजपचे दिवंगत नेते ग़ोपीनाथ मुंडे यांच्या नंतर मराठवाड्याला दुसर्‍यांदा प्रदेशाध्यक्षपद मिळालं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close