प्रदेशाध्यक्षपदी रावसाहेब दानवेच का ?

January 6, 2015 10:02 PM1 commentViews:

 06 जानेवारी : भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी अखेर अपेक्षेप्रमाणेच रावसाहेब दानवेंची नियुक्ती करण्यात आलीय. खरंतर परवा दिवशीच मुंबई झालेल्या प्रदेश भाजपच्या बैठकीत दानवेंच्या नावावर शिक्कामोर्तब झालं होतं. आज फक्त त्याची अमित शाहांनी दानवेंच्या नावाची घोषणा केलीय. पण प्रदेशाध्यक्षपदी दानवेच का असा प्रश्न उपस्थित होतोय.

राजकारणात खरं तर प्रदेशाध्यक्ष ते मंत्रिपद हा प्रवास प्रगतीचा आलेख मानला जातो. पण दानवेंनी नेमक्या याच्या उलटं केलंय. ते प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी चक्क केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देत आहेत. यामागेही त्यांची स्वतःची काही राजकीय आडाखे आहेत. पण भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी रावसाहेबांची निवड करण्यामागे महत्वाची कारणं आहेत.

रावसाहेब दानवेच का ?

- दानवे हे मराठा समाजाचे आहेत. राज्यात सर्वांत महत्त्वाच्या या समाजात भाजप रुजवणं पक्षाच्या वाढीसाठी गरजेचं आहे
– तसंच प्रदेश भाजपमधील सर्व गटातटांना सोबत घेऊन पार्टीत नक्कीच चांगला समन्वय साधू शकतात
– 2 वेळा आमदार, 4 वेळा खासदार असा दीर्घ अनुभव
– विदर्भाचा मुख्यमंत्री आणि मराठवाड्याचा प्रदेशाध्यक्ष असा समतोल साधला
– दानवे हे मराठवाड्यातील भाजपचे महत्वाचे नेते असल्याने आगामी औरंगाबाद मनपा निवडणुकीसाठी दानवेंचा पक्षाला निश्चितच फायदा होऊ शकतो

हे झाली दानवेेंच्या निवडीमागचे काही ठोकताळे. पण मराठा समाजातही दानवेंच का हा प्रश्न अनुपस्थित राहतो. कारण दानवे हे मराठा समाजाचे असले तरी ते भाजपमधल्या मराठ्यांचे नेते नक्कीच नाहीत…थोडक्यात पक्षात एवढी वर्षं काढूनही दानवेंनी कधीच स्वतःचा गटतट बांधला नाही. तसंच मुंडे गटाचा शिक्का असूनही मुंडे जाताच त्यांनी गडकरींशीही व्यवस्थित जुळवून घेतलं. दानवेंची ही लो प्रोफाईल इमेजच कदाचित प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीसाठी सर्वात महत्वाची बाब ठरली असणार यात शंका नाही. नाहीतर भाजपला आता काँग्रेसप्रमाणेच लो-प्रोफाईल नेतेच संघटना चालवण्यासाठी हवे असतात. तसंच, सत्तेत नसूनही सध्या अमित शहा सर्वशक्तिशाली आहेत. त्यामुळे शहांच्या टीममध्ये जाण्यातच लाँग टर्मसाठी फायदा आहे, हे दानवेंनी ओळखलं नसतं, तरच नवल.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Batman

    Danave yanchi nivad marathawadya sathi nakkich bhuchan aahe. mantri asnya peksha maharashtrache adhya ksha hone sanghatanasathi faydyache aahe.te kontya gatache ha vad faltu aahe .pakshne ghetalela nirnay agadi yogya aahe. magas marathawada pragatipathavar nenya sathi yacha fayda hoil. danve yanche abhinandan.

close