‘देव तारी…’,चौथ्या मजल्यावरुन पडूनही चिमुरडी बचावली

January 6, 2015 9:13 PM1 commentViews:

06 जानेवारी : ‘देव तारी त्याला कोण मारी’ अशी मराठीत म्हण आहे…त्याचाच प्रत्यय गुजरातमधल्या वलसाडमध्ये आला.एक चार वर्षांची  चिमुरडी खेळता-खेळता चौथ्या मजल्यावरून पडली. पण, आश्चर्यकारकरित्या ती बचावलीये. तिला जराही लागलं नाही. माही असं या मुलीचं नाव आहे. माही पडल्याचं कळताच तिचे पालक धावत खाली गेले. पण, तिला ओरखडाही आला नव्हता. हे बघून तिच्या पालकांना सुखद धक्काच बसला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • sankalp deshpande

    tila uchaltac camera war kasa jhala?…….

close