हिंदू महिलांनी प्रत्येकी चार मुलांना जन्म द्यावा – साक्षी महाराज

January 7, 2015 11:55 AM1 commentViews:

sakshi_maharaj_342

07  जानेवारी :  प्रत्येक हिंदूंने चार मुलांना जन्म द्यावा, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे उन्नावचे खासदार साक्षी महाराज यांनी केले आहे. साक्षी महाराज यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या सरकारपुढे पुन्हा एकदा विरोधक अडचण निर्माण करण्याची शक्यता आहे.

मेरठमधील ‘संत समागम महोत्सवा’दरम्यान बोलताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. ‘ भारतात चार बायका आणि 40 मुले ही संकल्पना चालणार नाही. त्यामुळे हिंदू धर्माचे रक्षण करायचे असेल तर प्रत्येक हिंदू महिलेने कमीतकमी चार मुलांना जन्म दिला पाहिजे,’ असे ते म्हणाले.

साक्षी महाराज यांनी नथुराम गोडसे राष्ट्रभक्त असल्याचे वादग्रस्त वक्तव्य याआधीही केले होते. त्यावेळी लोकसभेमध्ये विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित केल्यावर त्यांना माफी मागावी लागली होती. पंतप्रधान मोदींनी भाजपच्या सर्व खासदारांना सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये बोलताना वादग्रस्त वक्तव्ये न करण्याची तंबी दिली होती. लक्ष्मणरेषा ओलांडू नका, असा इशाराही मोदी यांनी पक्षाच्या खासदारांना दिला होता. मात्र त्यानंतरही भाजप नेत्यांनी मुक्ताफळं उधळणं सुरूच ठेवले आहे.

साक्षी महाराज आणि वाद

  • डिसेंबर 2014 : नथुराम गोडसेला राष्ट्रभक्त म्हटल्यानंतर माफी मागावी लागली
  • सप्टेंबर 2014 : मदरशांमध्ये दहशतवादाचे धडे मिळतात या साक्षी महाराजांच्या वक्तव्यानंतर वाद पेटला होता
  • एप्रिल 2013 : एका कॉलेजच्या माजी प्राचार्यांच्या खुनाच्या आरोपाखाली साक्षी महाराजांना अटक झाली होती.
  • 2006 : मतदारसंघ विकास निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी राज्यसभेतून निलंबित
  • 1992 : बाबरी मशीद विध्वंसप्रकरणी साक्षी महाराजांवरही आरोप आहे
  • याशिवाय बलात्काराच्या आरोपाखाली साक्षी महाराजांना जेलमध्येही जावं लागलं होतं.  नंतर त्यांची सुटका झाली

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Ramchandra Raipure

    जाती धर्माच्या विच्यारा पेक्षा भारत देशा चा विचार करावा

close