तुरुंगातील कैदीही शारीरिक संबंध ठेवू शकतात – हायकोर्ट

January 7, 2015 11:23 AM0 commentsViews:

Punjab High court

07 जानेवारी : मूलभूत हक्क जपण्यासाठी तुरुंगातील कैद्यांना आपल्या जोडीदारांबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यास परवानगी देण्याचा महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने दिला आहे. अपत्य होण्यासाठी शरीर संबंध ठेवणं हा मुलभूत अधिकार आहे,  असं कोर्टाने म्हटलं आहे.

फाशीची शिक्षा झालेल्या एका जोडप्याने आम्हाला मूल होण्यासाठी एकत्र राहू द्या, अशी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर भाष्य करताना कोर्टाने हा निर्णय दिला आहे. जेलमध्ये शरीर संबंध ठेवण्यासाठी व्यवस्था व्हावी, यासाठी एका कमिटीची स्थापन करावी, असा आदेशही हायकोर्टाने दिला आहे.

‘ज्या समाजात समलैंगिकांचे हक्क आणि तृतीयपंथीयांना मान्यता देण्यावर चर्चा सुरू आहे, तो समाज कैद्यांचे शरीरसंबंध हा मुद्दा टाळू शकत नाही. समाजाच्या सर्व घटकांनी एकत्र बसून या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची वेळ आली आहे.’ असं कोर्टाने म्हटलं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close