महावितरणचा दणका : वीजदरात 4 टक्क्यांनी वाढ

August 22, 2009 7:25 AM0 commentsViews: 6

22 ऑगस्ट बेस्टच्या दरवाढी पाठोपाठ आता महावितरणनंही वीजदरांत वाढ केली आहे. येत्या एक ऑगस्टपासुन नवीन दरवाढ लागू होईल. महावितरणने 36 टक्के इतकी भरभक्कम वाढ मागितलेली असताना, राज्य वीज आयोगानं 4 पुर्णांक 2 टक्क्यांची वाढ मंजुर केली आहे. यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. घरगुती ग्राहकांना आता 0 ते 100 युनिटसाठी 2.35 रुपये मोजावे लागतील. 101 ते 300 युनिटसाठी 4.25 रुपये तर 301 ते 500 युनिटसाठी 5.85 रुपये मोजावे लागतील. पाचशे युनिटच्यावर वापर असणार्‍यांना 6.85 प्रती युनिट मोजावे लागणार आहेत.

close