22 ऑगस्टपासून राज्यभरात रिपब्लिकन ऐक्याच्या सभांचा धडाका

August 22, 2009 7:31 AM0 commentsViews: 5

22 ऑगस्टरिपब्लिकन एकीकरणानंतर रिपब्लिकन आघाडीची पहिली जाहीर सभा 22 ऑगस्टला नाशिकमध्ये होत आहे. तर जाहीर सभा 25 ऑगस्ट रोजी औरंगाबादेतील भडकलगेट येथे होणार आहे. या सभेत सर्व ऐक्यवादी संघटना सहभागी होणार आहेत. या सभेच्या आयोजनाची सुरुवात एकीकरणाच्या सर्व गटांच्या स्थानिक नेत्यांनी सुरु केली. पहिलीच सभा नाशिकमध्ये होत असल्याने, राजकीय अर्थानंही ती अतिशय महत्त्वाची आहे. ही सभा यशस्वी होईलच असा विश्वास रिपब्लिकन नेत्यांना वाटत आहे. रिपब्लिकन ऐक्यवादी संघटनांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील काँग्रेस तसंच राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज उमेदवारांसमोर संकट उभं राहणार आहे. त्यातच काँग्रेसचे नेते दिग्विजयसिंग यांनी दलित संघटनांच्या गटातटावर केलेल्या टीकेमुळे या संघटनांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटतेय. 25 ऑगस्ट रोजी होणार्‍या सभेच्या तयारीसाठी या मुद्द्यावरसुद्धा चर्चा झाली.

close