चोरीचा आळ घेतल्याने विद्यार्थ्याच्या आत्महत्येचा प्रयत्न ?

January 7, 2015 9:19 PM0 commentsViews:

kolhapur_hostel07 जानेवारी : कोल्हापूर जिल्ह्यात पाचगामध्ये राजर्षी शाहू आश्रमशाळेतल्या एका विद्यार्थ्यानं अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. सूरज पवार असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. अधिक्षकांनी चोरीचा आळ घेतल्यानं त्यानं हा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप सुरजच्या नातेवाईकांनी केलाय.

पाचगामध्ये भटक्या विमुक्त जाती जमातीतल्या विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू आश्रमशाळेतील 9 व्या वर्गात शिकणार्‍या सूरज पवार या विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे एकच खळबळ उडालीये. आश्रमशाळेच्या अधिक्षकांनी चोरीचा आळ घेतल्यानं त्यानं हा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप सुरजच्या नातेवाईकांनी केलाय. या घटनेनंतर सुरजच्या नातेवाईकांनी शाळेतल्या शिक्षकांना आणि अधिक्षकांना धक्काबुक्की केल्यानं शिक्षकही आता आक्रमक झाले आहेत. सुरजवर सध्या कोल्हापूरमधल्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आज आश्रमशाळेत एकही वर्ग भरलेला नाहीय. तर दुसरीकडे सुरज यानं शाळेकडे लेखी अर्ज देऊन तो त्याच्या नातेवाईकांच्या घरी गेला आणि त्यानं हा आत्महत्येचा प्रयत्न केला, असा दावा शाळा प्रशासनाकडून करण्यात येतोय. तसंच शाळेत त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा आरोप लावण्यात आला नव्हता असा खुलासा आश्रमशाळेच्या प्रभारी मुख्याध्यापकांनी केलाय. पोलीस याबाबत अधिक तपास सुरू आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close