श्रीखंड खाल्लं म्हणून मुलीला बेदम मारहाण

August 22, 2009 7:37 AM0 commentsViews: 5

22 ऑगस्टमुंबईतल्या अंधेरीमध्ये एका नऊ वर्षाच्या मुलीला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीने मुलीला गंभीर दुखापत झाली आहे. रामेश्वरी असं या मुलीचं नाव असून तिने श्रीखंड खाल्लं म्हणून उर्वशी धानुरकर या टीव्ही कलाकारानं तिला बेदम मारहाण केली आहे. वडिल नसलेली ही मुलगी अत्यंत हलाखीच्या परिस्थीतीत आपल्या आई सोबत अमरावतीला राहत होती. अंधेरीच्या लोखंडवाला कॉम्पलेक्समध्ये राहणार्‍या डॉक्टर उर्वशी धानुरकरनी या मुलीला अमरावतीवरुन घरकाम करण्यासाठी आणलं होतं.

close