सुधींद्र कुलकर्णी यांचा भाजपला रामराम

August 24, 2009 6:08 AM0 commentsViews: 5

24 ऑगस्टभाजपचे चाणक्य समजले जाणारे सुधींद्र कुलकर्णी यांनी भारतीय जनता पक्षाला राम राम ठोकला. वैचारिक मतभेद झाल्याने पक्ष सोडत असल्याचं सुधींद्र कुलकर्णी म्हटलंय. जसवंतसिंग यांच्यावर केलेल्या कारवाईनंतर सुधींद्र कुलकणीर्ंच्या रुपाने भाजपला दुसरा मोठा हादरा असल्याचं मानलं जात आहे. कुलकर्णी हे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या खास मर्जीतले होते. अडवाणी त्यांचा उल्लेख सच्चा मित्र, उत्तम सहकारी आणि सर्वात विश्वासू व्यक्ती असा करायचे. त्यामुळे कुलकणीर्ंचा हा निर्णय अडवाणींनाच कोड्यात टाकणारा ठरला.आपल्या विचारांच्या बैठकीत बसणारा हा पक्ष नसल्याचं त्यांनी म्हटलं. भाजपशी फारकत घेतली असली तरी आपण दुसर्‍या कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचंही त्यांनी आवर्जून नमूद केलं. अंतर्गत मतभेद काय आहेत यावर मात्र कुलकणीर्ंनी कोणतीही टीप्पणी केली नाही. अडवाणींनी जिनांसंबंधी केलेल्या वक्तव्याला सुधींद्र कुलकर्णीच कारणीभूत होते, असं पक्षात बोललं जातं. मात्र, जसवंत सिंग यांच्या जीनाप्रकरणाशी आपल्या राजीनाम्याचा संबंध नसल्याचं स्पष्टीकरण कुलकणीर्ंनी दिलं. पण, जसवंत सिगांची हकालपट्टी ही दुदैर्वी घटना आहे, असं मत कुलकणीर्ंनी एका लेखात व्यक्त केलं होतं.जसवंत सिगांची हकालपट्टी हा पक्षाच्या दृष्टीने अतिशय दुदैर्वी पण आवश्यक असा निर्णय होता, असं मत अडवाणींनी व्यक्त केलं होतं. पण सुधींद्र कुलकणीर्ंच्या राजीनाम्याबाबत मात्र अडवाणींनी अजून कोणतंच मत व्यक्त केलेलं नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत या सगळ्या घटना नेमकं कोणतं वळण घेतात, याकड ेआता सर्वांचं लक्ष असणार.लोकसभा निवडणुकीत पराभवाची कडू फळं चाखलेल्या भाजपाला आता दरदिवशी नव्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. जसवंत सिंगांची हकालपट्टी, सुधींद्र कुलकणीर्ंचा राजीनामा आणि सहजासहजी नमतं घ्यायला तयार नसलेल्या वसुंधरा राजे, या कोड्यातून मार्ग काढण्यासाठी पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी संघाच्या नेत्यांसोबत पुन्हा चर्चेला सुरुवात केली आहे.

close