मुंबई मेट्रोच्या दरवाढीला हायकोर्टाची मंजुरी

January 8, 2015 2:03 PM0 commentsViews:

dasdnasjkfn

08  जानेवारी :   मुंबईकरांच्या खिशाला आता आणखी एका दरवाढीचा भार सहन करावा लागणार आहे. मुंबईत वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो रेल्वेच्या तिकीट दरवाढीच्या प्रस्तावाला हायकोर्टाने मंजुरी दिली आहे.

कोर्टाने राज्य सरकारची दरवाढीविरोधातील याचिका फेटाळताना रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरची बाजूने निर्णय दिला. मेट्रोने प्रवास करणार्‍यांसाठी सध्याचे तिकीट दर 10, 15 आणि 20 इतके असून कोर्टाच्या निर्णयामुळे ते आता 10, 20, 30 आणि 40 रुपये होतील. ही दरवाढ येत्या शनिवारपासून अंमलात आणण्यात येणार आहे.

जुलैपासून परिस्थिती ‘जैसे थे’च होती, परिणामी कंपनीला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत असल्याचे स्पष्ट करत रिलायन्सने दरवाढीच्या प्रस्तावाबाबत निर्णय देण्याची विनंती कोर्टाकडे केली होती. जनतेच्या हिताचा विचार करता दरवाढ करू नये, अशी विनंती राज्य सरकारने कोर्टानेडे केली होती. पण, ही विनंती हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे राज्य सरकारला दणका बसला असला तरी रिलायन्सला मात्र दिलासा मिळाला आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close