दुष्काळाचं राजकारण नको – खा. सुप्रिया सुळे

August 24, 2009 7:54 AM0 commentsViews: 18

24 ऑगस्ट दुष्काळासारख्या गंभीर विषयावर राजकारण करु नये, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी 'IBN-लोकमतला' दिलेल्या खास मुलाखतीत म्हटलं आहे. राज्यात आणि देशात सध्या दुष्काळाचं मोठं आव्हान आहे. शेतकर्‍यांची पिकं वाचवणं हि प्राथमिकता असल्याचं त्या म्हणाल्या, तसंच शेतकर्‍यांना आणि महिला बचत गटांना पुणे आणि सातारा बँकांच्या धर्तीवर इतर बँकांनी शुन्य टक्के व्याजदराचा निर्णय घेतल्यास राज्यातील दुष्काळाच्या परिस्थितीशी सामना करण्यास मदत होईल असं आवाहन त्यांनी केलं. येत्या विधानसभा निवडणुकीत पक्षश्रेष्ठी देतील ती जबाबदारी पार पाडू असं त्यांनी सांगितलं.

close