पुण्याच्या कचरा कोंडीवरुन राजकीय टोलवाटोलवी सुरूच !

January 8, 2015 5:23 PM0 commentsViews:

sule_vs javadekar08 जानेवारी : पुण्याच्या कचरा प्रश्नावरून राजकारण रंगलंय. बंद पडलेला हंजर प्रकल्प कोणी आणला असं म्हणत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री आणि पुण्याचे खासदार प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीकडे बोट दाखवलंय. कोथरुडमधल्या मयूर कॉलनी परिसरात जावडेकरांनी स्वच्छता मोहीम राबवली. त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, पुणे कचराप्रश्नात राजकारण असल्याचं नेत्यांच्या बोलण्यातून आढळतंय. बुधवारी उरळी देवाची आणि फुरसुंगी ग्रामस्थांची खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली होती. आघाडीच्या काळात कचर्‍याचा प्रश्न सद्यस्थिती इतका गंभीर नव्हता तो ऑगस्टपासूनच गंभीर बनल्याचं म्हणत नवीन महायुतीच्या सरकारकडे कचराप्रश्नाचा चेंडू टोलवला होता. तर आज जावडेकर यांनी आघाडी सरकारवरच कचरा कोंडीचं खापर फोडलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close