पुण्यातील शाळा-कॉलेजेस सुरू

August 24, 2009 9:09 AM0 commentsViews: 1

24 ऑगस्ट गेले 15 दिवस बंद असलेली पुण्यातली शाळा आणि कॉलेजेस सोमवारी पुन्हा सुरू झाली. H1N1चा वाढता संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी म्हणून शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांनाच जास्त संसर्ग झाल्यामुळे विशेष काळजी घेतली जात होती. मात्र H1N1च्या संसर्गात भरच पडत असल्याने पालकांमध्ये थोडं चिंतेचं वातावरण आहे.पुण्यात H1N1ने पुण्यात आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. तर देशभरात 67 जणांना H1N1मुळे प्राण गमवावे लागले आहेत. पुणे शहरात आणखी 84 जणांना H1N1चा संसर्ग झाल्याचं समजतं.

close