पुण्यात तरुणाची निर्घृण हत्या, प्राणघातक हल्ला सीसीटीव्हीत कैद

January 8, 2015 10:44 PM0 commentsViews:

08 जानेवारी : प्रेम विवाहाला विरोध होता म्हणून मुलीच्या नातेवाईकांनी एका तरूणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील वारजे भागात घडली आहे. सचिन शिंदे असं मृत तरूणाचं नाव आहे. सहा ते सात जणांच्या टोळक्यांनी गोळ्या झाडून आणि कोयत्या आणि धारधार शस्त्रांनी हल्ला चढवला यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी एका जणाला अटक करण्यात आलीये.

pune_muder_34घडलेली हकीकत अशी की, पुण्यातील वारजे माळवाडी भागात राहणारा सचिन शिंदे याचा त्याच भागात राहणार्‍या एका तरूणीशी वर्षभरापूर्वी प्रेम विवाह झाला होता. मात्र मुलीच्या घरच्यांचा या प्रेम विवाहाला विरोध होता. त्याचाच राग धरून मंगळवारी रात्री वारजे माळवाडी पुलाजवळ सचिनवर सहा ते सात जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केला.

हल्लेखोरांनी सचिन दिसताच क्षणी त्याच्यावर गोळ्या झाडल्यात. हल्लेखोरांनी सचिनवर तीन राऊंड फायर केले. गोळीबारानंतर सचिन जागेवरच कोसळला. पण तरीही हल्लेखोरांनी कोयत्याने सचिनवर वार केले. तब्बल 28 वार सचिनवर करण्यात आले. या भीषण हल्ल्यात सचिनचा जागेचं मृत्यू झाला.

सचिन शिंदेची हत्या ही मुलीच्या नातेवाईकांनीच केली असा आरोप सचिनचा भाऊ रोहित शिंदे याने केलाय. या प्रकरणी वारजे माळवाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून शुभम धावडे या आरोपीला केली आहे. पोलिसांनी शुभम धावडे आणि त्यांच्या साथीदारांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक म्हणजे सचिनवर झालेला हल्ला सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झालाय. या फूटेजच्या आधारे पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close