पुण्यात H1N1 ने आणखी तीन मृत्यू

August 24, 2009 9:14 AM0 commentsViews: 2

24 ऑगस्टपुण्यात H1N1 ने आणखी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. कमांड हॉस्पिटलमध्ये अडीच वर्षीच्या ताई बागल या मुलीचा, तर ससून हॉस्पिटलमध्ये उज्ज्वला वाघचौरे या 36 वर्षांच्या महिलेचा H1N1 मुळे मृत्यू झाला. कमल वाघले या 42 वर्षांच्या महिलेचा भारती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना मृत्यू झाला. त्यामुळे पुण्यात H1N1 मुळे आतापर्यंत 22 जण दगावले आहेत. तर देशभरात 67 जणांना H1N1मुळे प्राण गमवावे लागले आहेत. पुणे शहरात आणखी 84 जणांना H1N1चा संसर्ग झाल्याचं समजतं.

close