हितंद्र ठाकूर तिसर्‍या आघाडीत नको – राजू शेट्टी

August 24, 2009 1:25 PM0 commentsViews: 3

24 ऑगस्टहितेंद्र ठाकूर यांना तिसर्‍या आघाडीत सामील करू नये, अशी मागणी राजू शेट्टी आणि कपिल पाटील यांनी केली. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी आणि सेना भाजप युतीला भक्कम पर्याय उभा करण्याचा प्रयत्न रिपब्लिकन नेत्यांनी चालवला आहे. रिपब्लिकन लेफ्ट-डेमोक्रेटीक फ्रंट असं तिसर्‍या आघाडीचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. डावे पक्ष आणि रिपब्लिकन पक्षांच्या ऐक्यवादी गटासह समविचारी पक्षांची ही महाआघाडी स्थापन करण्यात आली आहे. यात शेकाप, सीपीआय, सीपीएम, जनता दल सेक्युलर, समाजवादी पार्टी, राष्ट्रीय समाज पार्टी, समाजवादी जनपरिषद, स्वाभिमानी शेतकरी संघटना, लोकभारती, कुणबी सेना, वसई विकास मंच आदी छोट्या मोठ्या पक्षांची मोट बांधण्यात येणार आहे. या महाआघाडीने आधीच सर्व 288 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी महाआघाडीच्या नेत्यांची मंुबईत महत्वाची बैठक झाली. महाआघाडी हा भक्कम पर्याय असल्याचा दावा ऐक्यवादी रिपब्लिकन नेत्यांनी केला आहे. आमदार बच्चू कडू यांची प्रहार संघटनासुद्धा तिसर्‍या आघाडीत सामील झाल्याचं आठवले यांनी सांगितलं. विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाने तिसर्‍या आघाडीत सामील होण्याचं आवाहन रामदास आठवले यांनी केलं आहे.दरम्यान तिसर्‍या आघाडीला महाराष्ट्रात प्रतिसाद मिळणार नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील यांनी केला आहे. ज्यांना विधानसभेची निवडणूक लढवायची नाही, अशा काँग्रेस नेत्यांनी स्वबळाची भाषा करु नये, असा टोला त्यांनी विलासराव देशमुखांचं नाव घेता लावला.

close