सातार्‍यात जिलेटीन कांड्याचा स्फोट, 3 ठार

January 9, 2015 1:28 PM1 commentViews:

satara_blast345409 जानेवारी : सातार्‍यातील माण तालुक्यात जिलेटीन कांड्यांचा भीषण स्फोट झालाय. या स्फोटात 3 जण ठार झाले तर चार जण जखमी झाले आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना सातार्‍याच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात जिलेटीनच्या साठ्याचा स्पोट झाल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. माण तालुक्यातील बोथे या गावातील ही घटणा असून या ठिकाणी विविध कंपण्यांचे पवनचक्की उभारन्याचे काम सध्या सुरु आहे. या कामासाठी जिलेटीनचा मोठा साठा करुन ठेवण्यात आला होता. आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास या जिलेटीनचा मोठा स्फोट झाला. या स्फोटामध्ये या ठिकाणी काम करणार्‍या दादा जगदाळे,शशिकांत कुलकर्णी आणि संदीप माने या तीन कर्मचार्‍यांचा जागीच मृत्यू झाला तर चार कामगार गंभीररित्या जखमी झाले.

या स्फोटाची भिषनता इतकी मोठी होती की, घटनास्थळाहुन सुमारे एक किलोमिटर अंतरावर असलेल्या 25 घरांचे नुकसान झाले. तर हा आवाज जवळपास 10 किलोमिटर पर्यंत ऐकू आला. या स्फोटामुळे या भागातील नागरीक मोठ्या प्रमाणात भयभीत झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच या डोंगराच्या आजुबाजूला असलेल्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात हलवलं.

हा सर्व जिलेटीनचा साठा बेकायदेशीर होता हे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून हा साठा ज्या कामासाठी आणण्यात आला होता ते काम संपून तब्बल एक वर्ष पुर्ण झाले होते. मात्र तरीही तो साठा त्या ठिकाणाहुन हलवण्यात आला नव्हता. हा सर्व साठा माजी जि.प.सदस्य शेखर गोरे यांचा असल्याचे समोर आले आहे. गोरे यांनी कॉन्टीन एनर्जी प्रा.लि. या नावाने स्थापन करण्यात आली आहे या कंपनीच्या मार्फतच ही कामे केली जात असल्याच सांगितल जातंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Dhiraj Jadhav

    ishvar tyanchya Atmyas shanti Devo…..

close