एक्स्प्रेस-वे नव्हे ‘स्लो वे’, तिसर्‍या दिवशीही ट्रॅफिक जाम

January 9, 2015 2:26 PM0 commentsViews:

pune_express_high09 जानेवारी : सलग तिसर्‍या दिवशी मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर वाहतुकीचा बोजवारा उडालाय. आज मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर बोरघाट चौकीजवळ एका ट्रकला अपघात झाला. एसटी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातानंतर ट्रक उलटला. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

या अपघातामुळे एक्स्प्रेस हायवेवर खंडाळा एक्झीटपर्यंत तीन किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. सध्या वाहतूक संथ गतीनं सुरू आहे. दोन दिवसांपुर्वीच खंडाळा घाटाजवळ सिमेंट मिक्सर ट्रक उलटला होता. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. हा ट्रक हटवण्यासाठी क्रेन मागवण्यात आली होती पण क्रेनच हाय वेवर उलटल्यामुळे वाहतुकीचा चांगलाच बोजवारा उडाला होता. एक्स्प्रेस हाय वेवरून सुसाट जाता यावं यासाठी हायवे तयार करण्यात आला खरा पण आता हाय वेवरच वाहतुकीची कोंडी होत असल्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close