पॅरिसमध्ये पुन्हा गोळीबार, 1 ठार

January 9, 2015 3:12 PM0 commentsViews:

paris_new_firring409 जानेवारी : पॅरिस शहर पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेनं हादरलंय. तीन दिवसांतली ही चौथी घटना आहे. पॅरिसच्या ईशान्य भागात एका कारचा पाठलाग सुरू असताना हा गोळीबार झालाय. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.

‘चार्ली हेब्दो’ या साप्ताहिकावर झालेल्या हल्ल्याच्या हल्लेखोरांचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी एका संशयित वाहनाचा पाठलाग करत होते. त्यावेळी वाहनातील बंदूकधार्‍यांनी पोलिसांवर गोळीबार केला.

या बंदुकधार्‍यांनी काही लोकांना ओलीस ठेवल्याची माहितीही पुढे येतेय. या भागावर हेलिकॉप्टरनं विशेष लक्ष दिलं जातंय. आतापर्यंत नऊ जणांना ताब्यात घेण्यात आलंय.

अमेरिका आणि युरोपचे दहशतवादविरोधी पथकं या दोन्ही हल्लेखोरांचा याआधीपासून शोध घेत आहेत. दरम्यान, या हल्ल्याला न जुमानता येत्या बुधवारी साप्ताहिकाचा नवीन अंक काढण्याचा निर्णय या टीमनं घेतलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close