जिना राष्ट्रवादी होते – के. सुदर्शन

August 25, 2009 7:30 AM0 commentsViews: 20

25 ऑगस्ट लोकमान्य टिळकांसोबत काम करणारे मोहमद अली जीना हे प्रखर राष्ट्रवादी होते. तसंच फाळणीला जिना नव्हे महात्मा गांधी जबाबदार असल्याचा दावा आरएसएसचे माजी सर संघचालक के. सुदर्शन यांनी केलं आहे. इंदौर इथं झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी पाकिस्तानचे निर्माते असलेल्या जीनांवर ही स्तुतीसुमनं उधळली. पाकिस्तानसाठी 55 कोटी रुपये मागणार्‍या जीनांनी फाळणी टाळण्यासाठीही प्रयत्न करायला हवे होते, असंही त्यांनी म्हटलंय. जसवंतसिंगांची हकालपट्टी ही भाजपची अंतर्गत बाब असल्याचं सुदर्शन यावेळी म्हणाले. जिनांची स्तुती करणारे के. सुदर्शन हे आरएसएसचे पहिले ज्येष्ठ नेते आहेत. यापूर्वी जिनांची स्तुती केली म्हणून लालकृष्ण अडवाणी यांना भाजपचं अध्यक्षपद सोडावं लागलं होतं. तर माजी परराष्ट्रमंत्री जसवंतसिंग यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली होती.

close