सरकारी डॉक्टर्स संपावर तर मार्डचाही मंगळवारी लाक्षणिक संप.

August 25, 2009 7:37 AM0 commentsViews: 4

25 ऑगस्टराज्य सरकारच्या सर्व सिनीयर डॉक्टर्स संपावर असताना मंगळवारपासून 'मार्ड' या मुंबईतील रेसिडेंट डॉक्टरांच्या संघटनेनं लाक्षणिक संप पुकारलाय. सरकारी डॉक्टरांच्या संपामुळं शनिवारपासून ग्रामीण भागातली वैद्यकीय सेवा संपूर्णपणे कोलमडली आहे. याआधी 21 ते 23 जुलै रोजी सरकारी डॉक्टरांच्या महासंघाने काम बंद आंदोलन पुकारलं होतं. त्यावेळी पगारवाढीची मागणी मंजूर करण्यात आली होती. पण प्रत्यक्षात त्यासाठी अंदाजे 180 कोटी रुपये खर्चाची तरतूद करणं आवश्यक होतं. त्यासाठी मंत्रिमंडळाची मंजूरी घ्यावी लागणार आहे. आरोग्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आश्वासन दिल्यानंतर मंत्रिमंडळाच्या चार बैठका झाल्या. त्यात डॉक्टरांच्या पगारवाढीला मंजुरी मिळाली. पण थकबाकी द्यायला मंजुरी मिळाली नाही. ही थकबाकी मिळावी यासाठी हे आंदोलन केलं जात आहे. आंदोलनाचा फटका बसतोय पेशंटना. राज्यात 1817 प्राथमिक आरोग्य केंद्र, 443 ग्रामीण रुग्णालयं, 17 मनोरुग्णालयं, टीबी आणि मॅटर्निटी हॉस्पिटल तसंच 24 जिल्हा रुग्णालयंतली सेवा या आंदोलनामुळे बंद आहे.

close