एअर इंडिया कर्मचार्‍यांचा मंगळवार पासून संप

August 25, 2009 7:42 AM0 commentsViews: 2

25 ऑगस्टएअर इंडियाचे अंदाजे 20 हजार कर्मचारी मंगळवारपासून तीन दिवसांच्या संपावर जात आहेत. एअर इंडियाच्या मॅनेजमेंटनं कर्मचार्‍यांच्या पगारात पन्नास टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला होता. मॅनेजमेंटच्या या निर्णयाविरुद्ध कर्मचारी संपावर जात आहेत. जुलै महिन्यातही एअर इंडियाचे कर्मचारी याच कारणासाठी संपावर गेले होते. दरम्यान आर्थिक मंदीच्या काळात एअर इंडियाला अंदाजे 7 हजार 200 कोटींचं नुकसान सहन करावं लागलं आहे. त्यामुळे एअर इंडियाने सरकारकडे स्टिम्यूलस पॅकेज म्हणजेच आर्थिक मदतीची मागणी केली होती. यासंदर्भात सरकार आणि एअर इंडियाच्या मॅनेजमेंटची आज बैठक होत आहे. याच मुद्द्यावर शुक्रवारीही सरकार आणि एअर इंडियाची बैठक झाली होती. मात्र यातून कोणताही तोडगा निघाला नाही.

close