बेळगावमध्ये ऑईलच्या स्टॉप डेपोला आग

January 10, 2015 11:47 AM0 commentsViews:

belgao fire

10  जानेवारी :  बेळगाव येथे देसूर ऑईल डेपोमध्ये आज (शनिवारी) सकाळी आग लागली होती. रेल्वे बोगीतून टँकरमध्ये डिझेल भरताना आग लागली. तब्बल 5 तासांनंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली.

या परिसरात तब्बल 2 किलोमीटर्सपर्यंत या आगीचे लोळ दिसत होते. रेल्वे स्टेशनला लागूनच हा ऑईल डेपो आहे. त्यामुळे बेळगाव – खानापूर रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली होती. या ऑईल डेपोची क्षमता 70 हजार लीटर्सची आहे. या आगीमुळे मुख्य ऑईल डेपोला कोणाताही धोका पोचला नाही पण कोट्यवधी रुपयांचं तेल या आगीत जळून खाक झालं आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close