थरारक ओलीस नाट्य संपुष्टात; पॅरिसने सोडला सुटकेचा श्वास

January 10, 2015 2:56 PM0 commentsViews:

paris terror drama

10 जानेवारी :  चार्ली हेब्दो साप्ताहिकावर भीषण हल्ला चढवून 12 जणांचा बळी घेणार्‍या दोन्ही हल्लेखोर भावंडांचा फ्रान्स पोलिसांनी खात्मा केला आहे. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या तणावाच्या वातावरणातून पॅरिसने सुटकेचा नि:श्वास टाकला. सूत्रांक़डून मिळालेल्या माहितीनुसार चार्ली हेब्दोवरच्या हल्ल्याची अल कायदाने जबाबदारी घेतली आहे. या हल्ल्यांचा मुख्य सूत्रधार शेरीफ क्वाचीने येमेनला 2011मध्ये भेट दिल्याचंही समोर येत आहे. याविषयीचा तपास येमेनने सुरू केला आहे.

चार्ली हेब्दोवरील भयानक हल्ला आणि त्यानंतर या हल्लेखोरांनी स्वत:च्या बचावासाठी निरपराध लोकांना ओलीस ठेवल्याने पॅरिस हादरले होते. फ्रान्स पोलिसांसह विशेष पथके सलग तीन दिवसांपासून या हल्लोखोरांच्या मागावर होते. फ्रेंच सुरक्षा दलाने शहर बंद करून पॅरिसमधल्या लोकांच्या आणि तिथल्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कारवाई हाती घेतली. शुक्रवारी दुपारी हल्लेखोर सईद क्वाची आणि शेरीफ क्वाची एका गोदामात लपले होते. ते ज्या गोदामात दडी मारून बसले होते, त्या इमारतीला वेढा घातला.

तर दुसरीकडे पॅरिसच्या पूर्वेकडील कोशेर सुपरमार्केटमध्ये शिरलेल्या एका बंदुकधारीने पाच जणांना ओलीस ठेवले. पोलिसांनी हल्ला केल्यास त्यांना ठार मारण्याची धमकी त्याने दिली होती. कोशेर सुपरमार्केटचा जवळचा भाग पोलिसांनी सीलबंद केला. या भागाला छावणीचे स्वरूप आले होते. या हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात अनेक जण जखमी झाले. पण 26 वर्षांची दुसरी तरूण महिला अतिरेकी पळून जाण्यात यशस्वी ठरली. मात्र त्यांनी चार ओलिसांची हत्या केली. पळून गेलेल्या अतिरेकी महिलेचा फ्रेंच पोलीस शोध घेत आहेत. याच अतिरेक्यांचा महिला पोलिसावरच्या हल्ल्यामागे हात असल्याचा संशय आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close