संपकरी प्राध्यापकांवर शिस्तभंगाची कारवाई

August 25, 2009 11:57 AM0 commentsViews: 6

25 ऑगस्ट राज्य सरकारने 30 हजाराहून अधिक संपकरी प्राध्यापकांवर शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश दिले आहेत. प्राध्यापकाच्या संपाबाबत सरकारने आता कठोर भूमिका घेतली आहे. प्राध्यापकांच्या संपाचा मंगळवारचा 42 वा दिवस आहे. 14 जुलैपासून महाराष्ट्र अध्यापक महासंघाच्या नेतृत्वाखाली प्राध्यापक बेमुदत संपावर गेले आहेत. पगारवाढीसह इतर 32 मागण्या त्यांनी ठेवल्या आहेत. प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या चालवलेल्या अडवणुकीवर आता तीव्र प्रतिक्रिया उमटायला सुरवात झाली आहे.प्राध्यापक संपाचं हत्यार खाली ठेवायला तयार नाहीयेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे याची पर्वा त्यांना नाही. प्राध्यापकांच्या बेमुदत संपामुळे फक्त लेक्चर्स ठप्प पडली नाहीत, तर कमवा आणि शिका योजनाही ठप्प पडली आहे. पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज पडून आहेत. स्पोर्टस आणि एनएसएस च्या ऍक्टिवीटी बंद पडल्या आहेत आणि पेपर सेंटीग न झाल्याने परीक्षेच्या वेळापत्रकावर प्रश्नचिन्ह लागलं आहे.

close