उद्धव ठाकरेंच्या फोटो प्रदर्शनाला राज ठाकरेंची हजेरी

January 10, 2015 7:13 PM0 commentsViews:

 

10 जानेवारी :  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीसाठी भरवलेल्या छायाचित्र प्रदर्शनाला आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली. भावाने काढलेली छायाचित्रं बघण्यासाठी राज ठाकरे जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये आले होते. या प्रदर्शनाच्या निमित्ताने राज आणि उद्धव, हे दोन्ही ठाकरे बंधु पुन्हा एकदा एकत्र आलेत.

“उद्धव हा उत्तम फोटोग्राफर आहे. त्याची कला मी लहानपणापासून पाहात आलो आहे”, असं कौतुक राज ठाकरे यांनी केलं.

मुंबईतल्या जहांगीर आर्ट गॅलरीत उद्धव ठाकरेंच्या फोटोंचं प्रदर्शन सुरू आहे. हे प्रदर्शन 7 ते 13 जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं आहे. या प्रदर्शनातील फोटोंच्या विक्रीतून शेतकर्‍यांना आर्थिक मदत केली जाणार आहे. त्याच उद्देशाने उद्धव ठाकरे यांनी या प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे. या प्रदर्शनासाठी राजकारण्यांसह सर्वच क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close