सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा पुढच्या सत्रापासून बंद

August 25, 2009 12:01 PM0 commentsViews: 3

25 ऑगस्ट शालेय शिक्षणात क्रांतीकारक बदल करण्याची घोषणा केल्यानंतर केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री कपिल सिब्बल यांनी आता या सुधारणांसाठी एक नवीन योजना लागू केली आहे. त्यानुसार गुणांऐवजी आता पर्सेंटाईल पद्धत CBSE साठी लागू होईल. सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा पुढच्या सत्रापासून बंद करण्यात येणार आहेत. मार्कांऐवजी आता ग्रेड पद्धत अमलात येणार आहे. ग्रेड पद्धत बंधनकारक असली तरी बोर्डाची परिक्षा देण्याचा पर्यायही विद्यार्थ्यांसमोर असणार आहे. पण ग्रेड ही फक्त परीक्षेवर आधारित नसेल, तर वर्षभरातल्या कामगिरीच्या आधारावर विद्यार्थ्यांना ग्रेड देण्यात येईल. आजारी असल्यास विद्यार्थ्यांना नंतरही परीक्षा देता येणार आहे. 2010 पासून दहावीच्या परीक्षेत हे नियम लागू करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्याला E ग्रेड मिळाली तर तो नापास समजला जाईल. पाचपैकी किमान चार विषयांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला पास होणं बंधनकारक असेल.

close