मॉल्सना वीज दरवाढीतून सूट दिल्यास मॉल्स बंद पाडू – राज ठाकरे

August 25, 2009 2:29 PM0 commentsViews: 6

25 ऑगस्टमॉल्स आणि कन्स्ट्रक्शन साईटसना वीज दरवाढीतून सूट देणं रद्द करा नाहीतर गुरुवारपासून मनसे आंदोलन करील असा इशारा राज ठाकरेंनी दिलाय. होडीर्गवरच्या अनावश्यक वीज वापरावर निर्बंध आणा, लोडशेडिंग सुरू असताना मॉल्स, कंन्स्ट्रक्शन साईट यांना सूट का, असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे.वीज दरवाढी विरोधात मंगळवारी त्यांच्या घरी घेतलेल्या प्रेस कॉन्फरंसमध्ये ते बोलत होते. जर मॉल,कंन्स्ट्रक्शन साईटला यातून सूट दिली तर आम्ही ते बंद करू असा इशारा राज ठाकरेंनी दिला. तोडफोडी साठी सरकारच आम्हाला भाग पाडतं असंही राज ठाकरे म्हणाले.करमणूक साधनं ,होडीर्ंग यांचे दर का वाढवत नाही आणि वीज वाचवा हे सल्ले फक्त सामान्य माणसांना का दिले जातात असा सवाल राज यांनी राज्य सरकारला केलाय.

close